अक्षयपात्राचा फुड फेस्टीवल २६ फेब्रुवारीला
- Kaustubh Shukla
- Jul 25, 2024
- 1 min read
नागपूर महापालिका व शेफ, प्रसिद्ध क्रीडापटू, अभिनेते, अनुदानित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनाचा भार अक्षयपात्र व शेअर अवर स्ट्रेंथ या संस्थांनी उचलण्याचा संकल्प घेतलाय. १५ हजार शालेय विद्यार्थ्यांचे टार्गेट त्यांनी ठेवले आहे. या उपक्रमात सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी २६ फेब्रुवारीला चिटणवीस सेंटरमध्ये एका उपक्रमाचे आयोजन केले आहे.
या उपक्रमात भारतातील व अमेरिकेतील मास्टर संगीतकार सहभागी होणार आहे. शिवाय फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून या अभियानापासून निधीही संकलित करण्यात येणार असल्याची माहिती शेअर अवर स्ट्रेंथचे सीईओ जितेंद्र जोधपूरकर व अक्षयपात्रचे सीईओ श्रीधर व्यंकट यांनी केले आहे. कोरोनापूर्वी नागपुरातील १६० शाळेमध्ये अक्षयपात्र विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवित होते. उपक्रमात त्यांच्याकडे १५ हजार विद्यार्थ्यांचे अन्न बनविण्याचे मोठे युनिट आहे, पण कोरीनाच्या काळात अक्षयपात्रचे वितरण बंद झाले. पण आता अमेरिकेतील शेअर अवर स्ट्रेंथ या संस्थेने या अक्षयपात्रसोबत भागीदारी करण्याचा संकल्प घेतलाय. त्यांच्यासोबत परसिस्टंट सिस्टीमचे समीर बेंद्रे, राम परसोडकर, सचिन जहागीरदार, जितू नायक हेदेखील सहभागी आहे

.
Comments